
उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर सेवा सहकारी सोसायटीची 2 फेब्रुवारी रोजी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या ताब्यात आली असून ,विद्यमान चेअरमन तुकाराम वारकड गुरुजी ,तेलंगवाडीचे सरपंच सुरेश मामा बास्टे ,मा.वैजनाथ पा.घोरबांड यांच्या नेतृत्वाखालील गटाला तेरापैकी तेरा जागेवर यश मिळाले आहे.

कंधार तालुक्याचे लक्ष वेधून घेणारी उस्माननगर सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक अतिशय चुरशीची आणि अटीतटीची झाली.दि.२ फेब्रुवारी २०२३ रोजी उस्माननगरीतील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर सकाळपासूनच गर्दी जमण्यास सुरुवात झाली या निवडणुकीमध्ये उस्माननगर , तेलंगवाडी ,कांजाळा ,वाडी ,तांडा गावाचे मतदार होते. या निवडणुकीत खा. मा. प्रतापराव पाटील चिखलीकर पुरस्कृत विद्यमान चेअरमन वारकड गुरुजी यांचे शेतकरी विकास पॅनल एक गट तर. दुसरा गट महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी परिवर्तन पॅनल हे आमने-सामने निवडनुक लढवित होते.

आणि लोकनेते कै. माधवराव पांडागळे राष्ट्रीय काॅग्रेस पुरस्कृत शेतकरी बचाव विकास पॅनल या गटाकडून केवळ दोन उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीमध्ये पूर्ण तयारिनिशी मैदानात उतरले होते. मागील अनेक सोसायटीच्या निवडणुका अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या .पण यावेळेस विरोधी गटाने एकास एक उमेदवार देऊन निवडणुकीत रंग भरला.त्यामुळे विद्यमान चेअरमन वारकड गुरुजी यांना या निवडणुकीत अतिशय मेहनत घ्यावी लागली .मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.आमच्या गटाला मतदान करा असे मतदारांना सांगताना दोन्ही गटांमध्ये दिवसभरात अनेक वेळा बाचाबाची होऊन प्रकरण हातघाईवर येताच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील प्रसंग टळला.

सोसायटीचे मतदान ७५ टक्के झाल्याने कोणत्या गटाला बहुमत मिळते यावर अनेकांनी पैजा लावल्या होत्या. अत्यंत अटीतटीच्या वातावरणात झालेल्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन यांच्या गटाला धक्का बसतो की काय ? अशी परिस्थिती विरोधकांनी निर्माण केली होती . नांदेड जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या ताब्यात उस्माननगर येथील सेवा सहकारी सोसायटी ताब्यात घेण्यात वारकड गुरुजी यांच्या गटाला यश मिळवित तेरापैकी तेरा जागा मिळाल्या तर विरोधकांना एकही जागा ताब्यात घेता आली नाही.मतदान पार पडल्या नंतर रात्री आठ वाजता उशिरा निकाल जाहीर झाल्यानंतर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला.

या मध्ये निवडण आलेले उमेदवार सर्वसाधारण उमेदवार – आडबे बालाजी विश्वनाथ (३५९ मते ) काळम अशोक गुणाजी(३७४ मते ) घोरबांड बुध्दाजी संभाजी (372 मते ) डांगे गोविंद रामा (३५४ मते ) देशमुख प्रदीपकुमार विनायकराव ( ३८३मते )भोंग देवराव शेषेराव (३४२मते ) लोहकरे माधव दादाराव ( ३४२मते )वारकड रूद्र रामकिशन (३६८ मते )अनुसूचित जाती – वररकड माधव सटवाजी (४१२मते ) महिला राखीव – इसादकर संभाजी (३९४ मते ) इतर मागासवर्गीय – मोरे रजेश विश्वनाथ ( ४०२ मते ) विमुक्त जाती /भटक्या जमाती – जाधव गुणू शामा (४२२मते ) या निवडण आलेल्या उमेदवारापैकी चेअरमन व व्हाईस चेअरमन कोण होईल ही उत्सूक्ता मतदारांना लागली आहे.

ही निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी मतमोजणी सुरू होण्यापूर्वीपासून ते मतमोजनी संपेपर्यंत सायंकाळी ८ वाजेपर्यंत उस्माननगर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष अधिकारी स.पो.नि.पी.डी.भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल पल्लेवाड यांच्या देखरेखी खाली तगडा पोलीस फोज फाटा उपस्थित होता.यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही व उस्माननगर येथील पोलीस पाटील विश्वनाथ मोरे हे मतदान केंद्रावर सकाळपासूनच शेवटपर्यंत उपस्थित होते.

