
भोकर। ग्रामीण रुग्णालय भोकर, तालुका आरोग्य अधिकारी भोकर, हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर व किनी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अंडवृध्दि रुग्णांनी येताना सोबत आधार कार्ड, राशन कार्ड घेऊन यावे. दुसर्या दिवशी दि. १० फेब्रुवारी रोजी निवड झालेल्या अंडवृध्दि रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभाग कडून करण्यात येत आहे.

नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे, जिल्हा हिवताप व हत्तीरोग डॉ आकाश देशमुख, भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अनंत चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी भोकर डॉ राहुल वाघमारे यांच्या मार्गदर्शनानुसार शिबीर घेण्यात येत आहे.

अंडवृध्दि रुग्णावर डॉ उत्तम वागदकर सर्जन शस्त्रक्रिया करणार आहेत.
आज भोकर तालुक्यातील व हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर अंतर्गत गावे मौजे पोमनाला, पिंपळढव व मातुळ येथे भेट देवून अंडवृध्दि रूग्णांना शिबीर माहिती दिली. सर्व गावांना भेटी देऊन अंडवृध्दि शस्त्रक्रिया शिबिराची माहिती देण्यात येणार आहे.

यावेळी भोकर तालुका हिवताप आरोग्य पर्यवेक्षक सत्यजीत टिप्रेसवार, हत्तीरोग नियंत्रण उपपथक भोकर आरोग्य सहाय्यक व्यंकटेश पूलकंठवार, आरोग्य कर्मचारी विठ्ठल मोरे, क्षेत्र कर्मचारी रामराव जाधव, गणेश गोदाम, राजू चव्हाण, रविंद्र चव्हाण व हत्तीरोग नियंत्रण उप पथक किनी अंतर्गत गावे कांडली, कांडली तांडा व लगलूद येथे भेट देऊन अंडवृध्दि रुग्णांना शिबिर माहीती दिली. हत्तीरोग नियंत्रण उपपथक किनी आरोग्य सहायक दत्तात्रेय ढाले, आरोग्य कर्मचारी प्रदीप गोदने, दिलीप इंदुरकर ,क्षेत्र कर्मचारी इंदल चव्हाण, मारोती गेंदेवाड आदी कर्मचारी होते.

