
अर्धापूर। शासकीय, अशासकीय सेवेत असतांना ईमानदारीने व पुर्णपणे मनलावून पारदर्शकपणे सेवा केल्यास निवृत्तीनंतर समाधान मिळते असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.

भाऊराव चव्हाण सह.साखर कारखान्याच्या परिसरात पशुधन विकास अधिकारी बि एन भोसले यांनी ३८ वर्ष यशस्वी सेवा करुन सेवा निवृत्त झाल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांचा सत्कार केला.

याप्रसंगी चेअरमन गणपतराव तिडके, उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रा.कैलास दाड, व्यंकटराव कल्याणकर,कार्यकारी संचालक श्याम पाटील, शिवाजीराव धर्माधिकारी, भगवान तिडके,डॉ सारखे,डॉ गायकवाड, डॉ वारकड डॉ हनुमंत तिडके देगावकर,पो पा जगन्नाथ तिडके, मधूकर जाधव, बालाजी जाधव,जी बी मदने,मोरे,भुस्से यांची उपस्थिती होती.

