
नांदेड/हिंगोली। २ फेब्रुवारी, २०२३ गुरूवार रोजी हिंगोली जिल्हयातील औंढा, येहळेगाव, मेथा, लोहगाव, भोसी, संतुक पिंप्री, लिंबाळा, नर्सी ना. तसेच हिंगोली जिल्ह्यातील काही भागामध्ये सायं. ०७ वाजून १० मिनिटांनी अवकाशामध्ये उडती तबकडीसारखे वस्तु दिसून आली.

यामुळे या परिसरातील नागरीकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू, सायंकाळी ७.१० ते ७.१५ वाजेपर्यंत तबकडीसारखी दिसणारी वस्तु ही उपग्रह होते. या उपग्रहाचे नाव स्टारलिंक इंटेरनेट सॅटेलाईट हे होते. या उपग्रहाचे निर्माण स्पेस एक्स म्हणजेच Space Exploration Technology ने डिसेंबर, २०१९ मध्ये करून स्टारलिंग उपग्रह प्रक्षेपीत करण्यास सुरूवात केली. हे उपग्रह इंटरनेटचे नक्षत्र असून, जे ४७ देशांमध्ये उपग्रह इंटरनेट प्रवेश कव्हरेज प्रदान करते.

सदर उपग्रह दर दुसऱ्या महिन्याला सॅटेलाईटचे लॉचिंग करते. एकाच वेळेस हे अनेक उपग्रह एकामागे एक एका रेषेमध्ये जातांना दिसतात ते एका संघामध्ये जाताना दृष्टिस पडते. यामुळेच याला स्टारलिंक उपग्रह असे संबोधल्या जाते. याचा उपयोग हायस्पीड इंटरनेट सेवा प्रदान करण्याकरीता होतो. याव्दारे अति दुर्गम भागात म्हणजेच डोंगराळ, दरी, दाट जंगले व इतर सर्व भागात विना अडथळा ही सेवा प्रदान केली जाते. या उपग्रहाची पृथ्वीपासूनची उंची ५५० ते ६०० कि.मी. अंतरावर असून, याचे वजन सुमारे २९० ते ३०० किलो इतके असते.

आशियाखंडामध्ये मोठ्याप्रमाणात या सॅटेलाईट इंटरनेटचा उपयोग फिलिपाईन्स या देशामध्ये होतो. भविष्यामध्ये भारत सरकाने परवानगी दिली तर यापुढे आपण सॅटेलाईट इंटरनेटचा उपयोग करू शकू. दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२३ रोजी न्यु मॉडेल डिग्री कॉलेज, हिंगोली येथील विद्यार्थी व जवळपास ४० कि.मी. परिसरातील नागरीकांसाठी हा विषय कुतूहलाचा ठरला होता. याबाबत महाविद्यालयातील प्रा. डॉ. पवन वासनीक, संगणकशास्त्र यांनी दिसून आलेली वस्तू ही उडती तबकडी, तुटता तारा किंवा उल्का नसून, ते इऑन रिवे मस्क, सीईओ स्पेस-एक्स टेक्नॉलॉजीचे स्टारलिंक कम्युनिकेशनचे सॅटेलाईट असल्याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

