
उस्माननगर, माणिक भिसे। येथून जवळच असलेल्या लोहा तालुक्यातील गोळेगाव (प.ऊ) येथील जि.प. प्राथमिक शाळा येथील एका शिक्षकाची दादागिरी चांगलीच गाजली असुन त्यांच्या बेजबाबदारपणाचा प्रत्यय येथील ग्रामस्थाना दि.२६ जानेवारी रोजी ऐन प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी आला.

हा शिक्षक मागील २० तारखेपासुन शाळेमध्ये कर्तव्यावर उपस्थित न राहता चक्क अनुपस्थित असलेल्या दिवसाच्या देखील सह्या हजेरीपटावर केल्याच आणी आणखी त्यात भर म्हणुन की काय हा शिक्षक प्रजसत्ताक दिनाच्या कार्यकमाला देखील मध्यधुंद आवस्थेत तर्र होऊन आल्याने ग्रामस्थ चांगलेच चक्रावले. याचा संबंधातीला जाब विचारला असता या शिक्षकाने ताबडतोब शाळेतुन पळ काढला व त्या दिवसापासुन हा विनापरवानगी शाळेतुन गायब असल्यामुळे विद्यार्थ्यांथ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या बेजबाबदार शिक्षकाला सेवेतुन बडतर्फ करावे अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी एका निवदेनाद्वारे जि.प. च्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

गोळेगाव या ठिकाणी कार्यरत असलेला शिक्षक ऐस.एन पानपट्टे हे मागील अनेक दिवसापासुन मनमानी पध्दतीने वागून, शालेय प्रशासनास त्रास देत असून, त्यांच्या वागणूकीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत सदर शिक्षकास तात्काळ निलंबित करुन कायमस्वरुपी बडतर्फ करण्याची मागणी गावातील सरपंच,सदस्यासह,शालेय समितीने व पालकांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षण अधिकारी (प्रा.) यांना देण्यात आले हि बाब या शिक्षकाची नित्याचीच झाली असल्याने शाळेतील शिक्षकासह ग्रामस्थ याबाबीला वैतागले असुन त्यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

त्याठिकाणी नवीन शिक्षक द्यावा अशी मागणी या निवेदनात केली आहे यावर सरपंच पारुबाई शेषराव गायकवाड, उपसरपंच कलावतीबाई माधवराव ढाले, ग्रामपंचायत सदस्य कैलास कोल्हे, रामचंद्र संभाजी मुरूड, स्वप्नील आनंदा शिराळे, कोंडिबा पाटील ढाले,शिवसेनेचे संजय पाटील ढाले, कैलास पाटील ढाले,संतोष पाटील शिंदे माधव शिराळे आदीसह शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांसह ५० गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.कनिस्ठ प्रशासन अधिकारी लोणीकर यांना निवेदन देण्यात आले.

