
अर्धापूर। तालुक्यातील मालेगाव येथील नवसाला पावणारा प्रसिद्ध दक्षिणमुखी महारुद्र यात्रेस 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे पाच फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी दीड वाजता श्री ची पालखीची मिरवणूक महारुद्र मंदिरापासून सुरुवात होणार आहे.

जुन्या परंपरेनुसार श्री ची पालखीची मिरवणूक महारुद्र मंदिरापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिजामाता चौक, सरस्वती शाळा, एसबीआय बँक समोरून जिल्हा परिषद शाळा, माळी गल्ली, ब्राह्मण गल्ली, महादेव मंदिर,दत्तात्रय मंदिर, लिंगायत गल्ली असा प्रवास सर्व गावातून श्रीच्या पालखीचा होतो. या पालखी सोहळ्या सर्व जाती-धर्माची नागरिक दर्शन घेतात त्याच दिवशी संध्याकाळी ठीक आठ वाजता भारुड रत्न ह भ प कृष्णा महाराज जोगदंड यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन महादेव मंदिर प्रांगणात होणार आहे.

दुसऱ्या दिवशी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी ठीक दोन वाजता जंगी कुस्तीचे सामने ठेवण्यात आला आहेत यामध्ये प्रथम बक्षीस 5001/- द्वितीय 3001/- तृतीय 2001/-असे बक्षीस ठेवण्यात आले आहेत. सहा फेब्रुवारी संध्याकाळी आठ वाजता ह भ प आचार्य अर्जुन महाराज लाड गुरुजी आळंदीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम महादेव मंदिर प्रांगणात ठेवण्यात आला आहे.
मालेगाव यात्रेनिमित्त म्हणजेच तिसऱ्या दिवशी सात फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या भव्य सत्यपाल वाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या यात्रेचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान महारुद्र देवस्थान ट्रस्ट कमिटी व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.

