
नांदेड। लुधियाना येथिल हुजूर साहिब जथा कमिटी ने आयोजित केलेल्या दर्शन यात्रेचे नांदेड व औरंगाबाद रेल्वे स्थानकावर भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले.

सचखंड एक्सप्रेस ने हि यात्रा दिल्ली-मनगाड मार्गे काल नांदेड येथे दाखल झाली असून या यात्रेत 240 जण सहभागी झालेले आहेत. श्री हुजूर साहिब जथा कमिटीचे अध्यक्ष सरदार कुलदीप सिंघ दीपा यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी हि यात्रा आयोजित करण्यात येते. लंगर साहिब गुरुद्वारा चे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघ जी व संत बाबा बलविंदरसिंघ जी यांनी सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा दिल्या. नांदेड येथील रेल्वे स्टेशन वर पंढरीनाथ बोकारे यांच्या वतीने यात्रेचे मनोभावे स्वागत झाले.

स्वागताला तुकाराम कोटूरवार, धनंजय उमरिकर, डॉ जयप्रकाश नागला हे उपस्थित होते. औरंगाबाद येथे नानक साई फाऊंडेशन चे उपाध्यक्ष चरण सिंघ पवार यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचे स्वागत करण्यात आले. 10 फेब्रुवारी ला हि यात्रा परतीचा प्रवास करणार आहे. सचखंड गुरुद्वारा, लंगर साहिब गुरुद्वारा सह नानक झिरा, मतासाहेब गुरुद्वारा, नरसी नामदेव मंदिराला यात्रा भेट देऊन दर्शन करणार आहे असे यात्रेचे संयोजक सरदार कुलदीप सिंघ दीपा यांनी सांगितले.

