
नवीन नांदेड। नरसिंह विद्या मंदिर प्रा. शा. सिडको नांदेड ची शैक्षणिक सहल ,परळी ,अंबाजोगाई या ठिकाणी गेली असून विधार्थीना प्राचीन महादेव मंदिर ,योगेश्वरी देवी बाबतीत माहिती देण्यात आली.

जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रवि शिवाजीराव जाधव यांच्या हस्ते बस चालकांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व त्यानंतर सहलीचे उद्घाटन करण्यात आले.मुख्याध्यापिका श्रीमती वंदना एकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख श्रीमती वर्षा पोहरे यांनी ही सहल आयोजित केली होती.

दोन एसटी बस ने ही सहल सिडको नांदेड येथून लोहा बालाजी मंदिर दर्शन घेऊन परळी वैद्यनाथ दर्शन व त्यानंतर अंबाजोगाई येथील माता योगेश्वरी देवीचे दर्शन घेतल्या नंतर परतीच्या प्रवासाने ही सहल सिडको नांदेड येथे आली.सहलीत सहभागी विद्यार्थ्यांनी मनमुराद पणे प्रवास व सहभोजन इत्यादी चा आनंद घेतला.या सहली साठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

