
नवीन नांदेड। शिवाजी विघालय सिडको येथील शैक्षणिक सहल रेल्वेने प्रवास करून विशाखापट्टणम येथे जाऊन विविध स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचालित शिवाजी विद्यालय सिडको परिसरातील नावालौकिकास आलेली शाळा असुन, या शाळेत शाळा प्रशासनाद्वारे अनेक शैक्षणिक,सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात.त्यापैकी यावर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन विशाखापट्टणम येथे करण्यात आले होते, शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक ,भौगोलिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचे सहलीच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञानप्राप्ती होत असते आणि म्हणून शैक्षणिक सहलीचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

सहलीचे आयोजन करताना संस्थेचे उपाध्यक्ष तथा उप मुख्याध्यापक रवी जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले. या सहलीत एकूण 32 विद्यार्थी व पाच शिक्षकांचा समावेश होता ही सहल यशस्वी करत असताना प्रा. साहेबराव देवरे , प्रा.संध्या तुपेकर, सौ.अनिता देगावकर, सुनील देवकर आणि नामदेव कोनापुरे यांनी परिश्रम घेतले. सदर सहल 29 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वाजून 35 मिनिटांनी नांदेड विशाखापटनम या एक्सप्रेसने प्रस्थान केले होते.

या सहलीत विद्यार्थ्यांनी नरसिंब्हा मंदिर, झू पार्क, ऋषीकोंडा बीच, रामा स्टुडिओ, कैलास गिरी, विशाखा म्युझियम, समरीन म्युझियम, आर के बीच, या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद मोठ्या उत्साहाने घेतला ही सहल दिनांक एक फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी दोन वाजता विशाखापटनम-नांदेड एक्सप्रेसने नांदेड येथे आगमन झाले त्यावेळी अनेक पालकांनी सहल यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे संबंधित शिक्षकांचे रेल्वे स्थानकावर स्वागत करून विद्यार्थी व शिक्षक यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.

