
हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव शहरासह तालुक्यात विना नंबर प्लेटचे टिप्पर ट्रक्टरचे ट्राली व आटो भरधाव वेगाने धावत आहेत. यामुळे नेहमी अपघाताची भिती निर्माण झाली आसुन परिवहन खाते व पोलिसांचे माञ अश्या वाहनाकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे हदगाव तालुक्यात आपघाताची संख्या वाढत आहे. या बाबतीत माञ प्रशासकीय यंञणा का गप्प आहे असा संतप्त सवाल नागरिकातुन व्यक्त होतांना दिसुन येत आहे.

सध्या हदगाव तालुक्यात गौण खनिज उत्खननात बहुतांशी टिप्पर ट्रक्टर वाहने विना क्रमांकाचे अवैध उत्खननात दिसुन येतात. त्याची अवैध वाहतूक जोमात सुरु असते गेल्या आठवड्यात आश्याच विनाक्रमांकाच्या आटोने सुसाट वेगाने पळवत असतांना तो आटो पलटी झाला. यामध्ये एकाचा बळी गेला तर अनेक जण गंभीर जख्मी झाले होते.

विना नंबरप्लेटच ‘गौडबंगाल …?
गौण खनिजची अवैधरित्या वाहतूक करण्यात यावी या करिता टिप्पर हायवा. या वाहनाला पोलिस किवा आरटीओने पकडले तर दंड लागु नये म्हणून नंबर प्लेट काढुन ठेवतात. किवा तो नंबर खोडुन काढतात वाहनाच्या दिसेना अश्या जागी नंबर प्लेट लावतात. हे सर्व काही जिल्हास्तारावरुन तालुका स्तारावर भेट देणा-या परिवहन विभागाच्या अधिका-याला माहीत असुनही दुर्लक्ष होते हे विशेष आहे. हदगाव तालुक्यात गौण खनिजची अवैधरित्या तस्करी करणा-याच नेटवर्क महसुल पोलिस व आरटीओ पेक्षा भारी असल्याच दिसुन येते. संबंधित विभागाचे अधिकारी नेमके कुठं आहेत…. क्षणार्धात त्यांना माहीती मिळते का..? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

बेशिस्त वाहतूक बद्दल नियोजन करु /पोलिस निरक्षक जगन्नाथ पवार
विनाक्रमांकाच्या बाबतीत वाहने आढळल्यास लगेच दडांत्मक कारवाई करण्यात येते. अवैध वाहतुक पार्कीग वेगाने धावणा-या वाहने विनानंबरची वाहनावर कडक कारवाई व दुचाकी वाहनाच्या नवीन नियमाच्या बाबतीत जनजागृती करिता लवकरच एक नागरिक व वाहनधारक सोबत बैठक घेणार असल्याची माहीती हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक जगनाथ पवार यांनी दिली.
