
लोहा। लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचे वडील स्व. सुभाष सावकार सूर्यवंशी यांचे मागील महिन्यात निधन झाले. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ जुना लोह्यात शिवछत्रपती विद्यालयाच्या प्रांगणात सोमवार ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरिकीर्तन सोहळा संपन्न होणार आहे. शहरात पहिल्यांदाच इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन-प्रवचन होत आहे.
नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या वडिलांचे मागील महिन्यात निधन झाले त्याच्या स्मृतीनिमित्ताने राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार तसेच सामाजिक प्रबोधन व वास्तव परिस्थितीवर प्रखडपणे हजारो लोकांच्या समोर विचार व्यक्त करणारे प्रसिद्ध किर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर याचे लोह्यात पहिल्यांदाच कीर्तन होत आहे.
जुन्या लोह्यातील शिवछत्रपती विद्यालयाच्या प्रांगणावर होणाऱ्या हभप इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनासाठी हभप आत्माराम महाराज रामेज्वार दत संस्थानाचे प्रमुख हभप लक्ष्मीकांत महाराज, यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

नादब्रम्ह हभप सदानंद महाराज रामेजवार, शंकर लोंढे,सोपान पौळ, प्रमोद महाराज चौंडीकर, माऊली महाराज दगडगावकर हे गायक -वादक यावेळी साथ देणार आहे .सोमवार ६ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या हभप इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तन सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केशव पवार, टिकाराम कतुरे व सहकारी यांनी केले आहे.

