
अर्धापूर। पौष्टीक तृणधान्य वर्षे अनुषंगाने पौष्टिक तृणधान्य जनजागृती तालुकास्तरीय सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून, अर्धापूर येथे या जागृतीचा प्रारंभ केला आहे.

अर्धापूर शहरात समन्वयक पवन काबरा,शालिग्राम जाधव,कृषी अधिकार अनिल शिरफुले, संजय चातरमल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पवन काबरा यांनी सविस्तर माहिती दिली.अनिल शिरफुले म्हणाले कि,कृषी प्रक्रिया व जनजागृती सप्ताहाचे व आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य तालुकास्तरीय सप्ताहाचे पारदर्शकपणे तालुक्यात राबवू, शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा फायदा घ्यावा. ठिंबकची प्रलंबीत सबसिडी लवकरच जमा होईल,असे म्हणाले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषी सहाय्यक सचीन स्वामी, प्रस्तावित मंडळ कृषी अधिकारी संजय चातरमल व आभार बोधमवाड यांनी मानले.याप्रसंगी सविता जरीकोटे, सौ.साळवणे, पाटील,बी बी गंजेवाड यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.

