
नविन नांदेड। वाघाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात वृक्षमित्र मोहन पाटील घोगरे यांच्या वतीने व वृक्ष मित्र फाऊंडेशन यांच्या वतीने विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी महिला युवक जेष्ठ नागरिक यांच्या सह परिसरातील अनेक नागरिक यांच्यी उपस्थिती होती.

वृक्ष मित्र मोहन पाटील घोगरे यांनी स्वखर्चाने या पुर्वी सिडको विसावा हनुमान मंदिर,दृरगा माता, साईबाबा मंदिर, गणपती मंदिर, चिंतामणी गणेश मंदिर,दंत मंदिर एन.डी ३१, हडको बसस्थानक, बुद्ध विहार इंदिरा गांधी शाळा,वाघाळा हनुमान मंदिर,कृष्ण मंदिर जे ३ व मुख्य रस्ता हडको येथे वृक्षारोपण करून झाडांची जोपासना केली आहे.

वाघाळा येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, सिडको भाजपा मंडळ अध्यक्ष वैजनाथ देशमुख,वृक्षमित्र संतोष मुगटकर व त्यांचे सहकारी , डॉ.शंकर स्वामी,डॉ.प्रकाश गुरूतवाड, तूकाराम पांचाळ,सुभाष शेट्टे, बालाजी रहाटकर ,शिवानंद निलावार, निवृत्ती रणबावळे, बालाजी पाटील घोगरे, काशीराम काळेवाड, चेअरमन दिंगाबर घोगरे, महेश घोगरे,सतिश घोगरे, बालाजी अनेराये, भगवान इंगेवाड,केरबा काळेवाड, कृष्णा घोगरे,दता घोगरे, बालाजी गजेवार, व हडको येथील श्रीदतकृपा महिला भजनी मंडळ चा माया जाधव,आगलावे, पार्वती गिरी, भुरे,रेणुकाबाई, शशीकला रणबावळे व इतर महिला नागरीक युवक ऊपसिथीत होते.

यावेळी ऊपसिथीत मान्यवरांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वृक्षारोपण करत असल्याबद्दल अभिनंदन केले असून प्रत्येक नागरीकांनी आपल्या निवासस्थानी समोर व मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून वृक्ष लागवड करावी असे आवाहन मोहन पाटील घोगरे यांनी केले.

