
नांदेड। येथील रिपब्लिकन चळवळीतील अग्रणी नेते भगवान ढगे यांना राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानचा ‘ रिपब्लिकन योद्धा ‘ पुरस्कार लोहा तालुक्यातील जवळा(देशमुख) येथे दि.८फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होणा-या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यात लक्षणीय कामगिरी बजावली आणि सर्व जाती धर्मात सामंजस्य टिकून राहण्यासाठी सतत धडपडणाऱ्या कार्यकर्त्यास हा गौरव प्राप्त झाल्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

