
नविन नांदेड। सांगली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयाखालील वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाचा विद्यार्थी ओंकार प्रभाकर मारतळे हा ५८ किलो वजन गटात सर्व द्वितीय आला आहे. सुरज प्रभाकर मारतळे हा विद्यार्थी ५५ किलो वजन गटात या स्पर्धेमध्ये प्रथम ठरला असून या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली यांच्या वतीने सांगली येथे जिल्हा क्रीडा संकुलात २८ ते ३१ जानेवारी दरम्यान या स्पर्धा घेण्यात आल्या. राज्यस्तरीय शालेय भेटली क्रीडा स्पर्धेत नांदेडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक संजय सबनीस यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नानासाहेब जाधव, सचिव एडवोकेट श्रीनिवास जाधव, प्राचार्य डॉ. शेखर घूंगवरवार, उप प्रचर्या प्रा. दिंडे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

