नांदेड। मराठी माणसाच्या र्हदयात कायम घर करणारी लावणी सम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांना स्वर श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
आपली माणसे आणि दै.प्रजावाणी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता येथील कुसूम सभागृहातला कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सुलोचना चव्हाण यांनी आपल्या अदभूत कंठातून गायलेल्या काही निवडक लावण्या आणि इतर गायिकांनी गायलेल्या काही दर्जेदार लावण्यांचा संगम असा हा कार्यक्रम सादर होणार आहे.
हा कार्यक्रम केवळ लावणी गायनाचा असून या कार्यक्रमाची संकल्पना-निर्मिती-निवेदन अॅड.गजानन पिंपरखेडे यांची असून दिग्दर्शन व निर्मिती सहाय्य कवी बापू दासरी, रमेश मेगदे व पत्रकार विजय जोशी यांचे आहे. तर संगीत संयोजन, लक्ष्मीकांत रवंदे, सिध्दोदन कदम व प्रा.डॉ.प्रसाद जोशी यांनी सांभाळले आहे. ध्वनी व्यवस्था व प्रकाश योजना संतोष गट्टाणी यांची असून, दृष्यतंत्र व्यवस्था आर.के. मुव्हीजचे रामकृष्ण सुर्वे यांची आहे.
या कार्यक्रमात लावणीचा खडा आवाज लाभलेल्या आसावरी जोशी रवंदे, सुलेखा उदय, परभणीच्या श्वेता त्रिनगरे, रागीनी जोशी व भाग्यश्री टोमपे या लावण्या सादर करतील तर पुरुषी आवाजातील काही लावण्या लक्ष्मीकांत रवंदे हे सादर करतील.
या कार्यक्रमात सिंथ साईझरसाठी पुण्याचे ओमकार उजागरे तर ढोलकीसाठी आंतरराष्ट्रीय ढोलकी वादक ओमकार इंगावले (पुणे) हे तर तबल्यासाठी सिध्दोदन कदम तर हार्मोनियमसाठी चिन्मय मठपती, ऑक्टोपॅड रतन चित्ते हे साथसंगत करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, माजी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपाचे आयुक्त डॉ.सुनील लहाने, ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी हे सर्व मान्यवर सपत्नीक उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम केवळ कपलसाठी व महिलांसाठी असून या कार्यक्रमात सिंगल पुरुष व्यक्तीस प्रवेश नाही. या कार्यक्रमाचा लाभ सर्व रसिकांनी घ्यावा, असे आवाहन रामनारायण बंग, जगजीवनसिंह रिसालदार, बालासाहेब मादसवाड, प्रणव मनूरवार, शंतनू डोईफोडे, नंदकुमार दुधेवार, रमेश मेगदे, बापू दासरी, लक्ष्मीकांत बंडेवार, गोवर्धन तेलंग, डॉ.शाम तेलंग, जितेंद्र जैस्वाल, सचिन कोटलवार, सचिन कोटलवार, रमाकांत गंदेवार, परमानंद तोष्णीवाल, संतोष पाळेकर, प्रविण कुपटीकर आणि विजय जोशी यांनी केले आहे.