
अर्धापूर, निळकंठ मदने। येथील वळण रस्ताचे बंद पडलेले काम अखेर सुरु झाले असून,आता शहरातून जाणाऱ्या १०० कोटींच्या रस्त्याचे काम सुरु करण्याची मागणी होत आहे. आता पार्डी येथील एका सर्वीस रस्ताचा प्रश्न प्रलंबित आहे,याकामी प्रशासनाने वेळ न घालता मार्ग काढावा, बोगस काम झालेल्या जागी रस्ता उखडत असून, सबंधीत अधीकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

अर्धापूर वळण रस्त्याचे काम शेतकऱ्यांनी पुर्ण मावेजा न मिळाल्याने रोकले होते,त्यात शेतकऱ्यांना शंभर फुट रस्याचाच मावेजा मिळाला होता,आणखी शंभर फुटाचा मावेजा मिळणे बाकी होते, त्यामुळे पुर्ण दोनशे फुट जमीनीचा मावेजा मिळाल्यावरच रस्त्याचे काम सुरू करावे कारण अर्धा रस्ता केल्यास पावसाळ्यात पावसाचे पाणी नाली नसल्याने शेतात येते व शेती पीकासह खरडून जाते यामुळे शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले होते,पण प्रशासनाने मावेजा मिळालेल्या शंभर फुटातच रस्त्याचे काम करु द्यावे अशी भुमिका प्रशासनाची होती.

यावेळी दोन वेळा अधीकारी परत गेले पण उपविभागीय अधिकारी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार मावेजा मिळालेल्या जमीनीवर रस्त्याचे काम करु द्यावे अशा आशयाचे तहसीलदार, पोलिस,व संबंधितांना पत्राद्वारे मावेजा मिळालेल्या जमीनीवर काम रोखणाऱ्यावर कारवाई चे आदेश दिले,या पत्राच्या आधारावर सबंधीत रस्त्यावर आले.

शेतकरी संघटीत झाले नसल्याने व उपस्थित शेतकऱ्यांना सबंधीत अधीकाऱ्यांनी पावसाळ्यापुर्वी रस्त्यालगत नाली काढून देतो यावर समाधान करुन अखेर बंद पडलेल्या रस्त्याचे काम सुरू झाले,हा रस्ता बंद असल्याने छोटी मोठी वाहने शहरातून धावत होती, त्यामुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत होता,आता शंकरराव चव्हाण महाविद्यालय ते वसमत फाटा या १००कोटींच्या रस्त्याचे काम पारदर्शकपणे मजबूत करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच पुर्णपणे लक्ष देऊन काम करुन घ्यावे,भोकरफाटा येथील नव्याने बनविण्यात आलेला सर्वीस रस्ता उखडला आहे.

तो सबंधीतांनी नव्याने बनवून घ्यावे व जागोजागी रस्ता न जोडल्याने वाहने जोरात आदळत असून,धुरळा उडत आहेत,व अपघात होत आहेत,ते जोड रस्ते जोडून घ्यावेत.पार्डी येथील एका बाजूचा सर्वीस रस्ता अर्धवट झाल्याने चक्क एकाच बाजूने पुर्ण वाहतूक जात असल्याने एखादे वाहन रस्त्यातच नादुरुस्त झाले तर वारंवार ट्रॅफिक जॅम होत आहे,याचा फटका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नेते मंडळीला बसला असून, रुग्णांना मोठा फटका बसत आहे.रस्त्यालगत पुर्णपणे मुरुम टाकला नसल्याने वाहतूक ठप्प चालत आहे.

पार्डी येथे अर्धवट नालीचे काम सुरू असून, नालीच्या जागेतच एक ट्रांन्सफार्मर आला असून,अनेक इलेक्ट्रॉनिक्स विद्युत खांब नव्याने रोवल्याने वाहनांच्या धडकेत मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.आसना पुलाचे के टी कंन्ट्रक्शनचे अभियंता लालबाबू यादव (बिहार) यांच्या पायावरुन हायवा गेल्याने त्यांचा पाय मांडीपासून कट करावा लागल्याने त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे,त्यांना के टी कंन्ट्रक्शनने मावेजा देण्याची मागणी होत आहे.अर्धापूर वळण रस्त्याचे प्रलंबित पडलेले काम सुरू झाल्याने के टी कंन्ट्रक्शनने काम सुरु केले आहे.

