
उमरी। श्री संत नरहरी सोनार महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गजर माऊलीचा उत्सव किर्तनाचा या भागात शेमारू मराठी बाणा टिव्ही चैनलवर दि.6.7.8. फेब्रुवारी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत सुश्राव्य चिंतनरूपी किर्तन ह.भ.प.संजय महाराज हिवराळे यांचे होणार आहे.

एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन घराण्यात वारकरी संप्रदायाची परंपरा कींवा वारसा नसताना देखील लहानपणापासून भजन, किर्तनाची आवड असल्याने वारकरी संप्रदायात रममाण होऊन श्रीक्षेत्र आळंदी येथे माऊलीच्या सानिध्यात राहून अभ्यास करीत अनेक सामाजिक, धार्मिक,आणि हिंदुधर्मासाठी कार्य करीत आहेत.

सामान्य कुटुंबातली व्यक्ती पांडुरंगाची कृपा व माऊलीचा, आई वडीलांचा आशिर्वाद असल्यास ऊच्च पदाला जाऊ शक्तो त्याचे हे उदाहरण आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात श्रीमद्भागवत कथा. तुलशी रामायण कथा. शिवपुराण कथा व किर्तन महोत्सवात समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती, ग्रामस्वछता अभियान, हुंडाबंदी, अशा अनेक विषयावर व्याख्यान देऊन नवतरुणांना धर्म व हिंदुधर्माच्या कार्यासाठी संबोधीत करून त्यांना व्यसनापासून मुक्त केले.

या आगोदर अनेक वेळा टिव्ही चैनलवर त्यांची किर्तन सेवा झालेली आहे. विशेष म्हणजे सकल संता पैकी एक सोनार समाजातील नरहरी सोनार महाराज हे शैव आणि वैष्णव उपासकांना भेद दुर करून शांतीचा संदेश देतात. भागवत धर्माची भगवी पताका पंढरपुरात फडकवली. यांच्या पुण्यतिथीनिमित्त नविन चिंतन घेऊन येत आहेत. या किर्तन सेवेचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

