
हिमायतनगर| किनवट तालुक्यातील मुरझळा येथील प्रवीण मारोती बोंगाळे वय (22) हा वडगाव ज येथे बहिणीला भेटण्यासाठी जात असताना सोमवारी दुपारी एका कार ने धडक देऊन सदरील कार पसार झाली या घटनेत डोक्याला गंभीर मार लागला असुन नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हिमायतनगर तालुक्यातील वडगाव ज येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी मुरझळा येथील प्रवीण मारोती बोंगाळे दुचाकीवर सोमवारी जात होता. वडगाव कारला दरम्यान एका चारचाकी सिफ्ट डिझायनर गाडीने पाठीमागून धडक दिली आणि कार चालक पसार झाला आहे.या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर पडला असता सदरील तरूणाच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने गंभीर जखमी झाले आहे.

तात्काळ उपस्थित असलेल्या नागरीकांनी त्या तरुणास खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचार केले नाही त्यामुळे त्या तरुणास नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सदरील घटनेतील तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री 8 वाजेपर्यंत उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

