
नांदेड| तरोडा खुर्द येथील श्री हनुमान मंदिरात सतत आठ दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ बुधवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

सतत आठ दिवस चालणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात सकाळी काकडा आरती, विष्णुसहस्रनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, भावार्थ रामायण, हरिपाठ, हरी किर्तन, जागर आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात ह. भ.प. डॉ.दत्तरामजी महाराज व्हळशिंगवाडीकर, रंगनाथ महाराज ताटे पोखरभोशिकर, व्यंकटराव महाराज दगडसांगवीकर, निवृत्तीनाथ महाराज ईसादकर, ज्ञानोबा माऊली खडकवाडीकर, ज्ञानोबा माऊली आरबूजवाडीकर,व शेवटी काल्याचे किर्तन ह.भ. प.ज्ञानोबा माऊली मुडीकर यांचे होणार आहे.. दि. १४ फेब्रुवारी रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य मिरवणूक व ह.भ.प.भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांचे पूजेचे कीर्तन, आणि सायंकाळी लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

कीर्तनातील मुख्य विनेकरी ह.भ.प. बाबुराव ग्यानोजी कल्याणकर, भावार्थ रामायण वाचक ह.भ.प. बाबुरावजी कल्याणकर, व्यंकटराव कल्याणकर, अंबादासराव कल्याणकर,मृदंगाचार्य म्हणून विश्वजीत आळंदीकर, ज्ञानेश्वर भोसले वाघीकर, गायकवृद शंकर माऊली रेंगावकर, तातेरावजी मरळकर, मुरलीधर दिवटे, माधव वसेकर, शिवाजी मार्कंडकर, नागोरावजी पिंपळेकर, नागोरावजी राहटीकर, यांच्यासह नांदेड शहर परिसरातील गायक,वादक उपस्थित राहणार आहेत. सतत आठ दिवस चालणाऱ्या या अखंड सप्ताहास भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आव्हान तरोडा खुर्द ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

