
उस्माननगर। संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष ” शिवा जनशक्ती पार्टी ” आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय संस्थेचे सचिव , बहुजन नेते प्रा. मनोहर धोंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त दि.८ फेब्रुवारी २०२३ बुधवारी महात्मा बसवेश्वर विद्यालय उस्माननगर येथे भव्य रक्तदान शिबीर , दंतरोग तपासणी , मोफत आरोग्य औषधी वाटप व विनोदाचार्य ह.भ.प. चंद्रकांत महाराज लाठकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सत्कारमूर्ती प्रा. मनोहर धोंडे सर ( संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष , शिवा जनशक्ती पार्टी) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्यामसुंदर जहागीरदार ( संचालक समता विद्यालय उस्माननगर) हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. एकनाथ उर्फ अनिल मोरे ( मा.सनद अधिकारी तथा सिनेअभिनेते ) , बालाजी पांडागळे ( मा . सभापती पं.स.कंधार तथा अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस कमिटी कंधार ) मा.सौ.लक्ष्मीबाई घोरबांड ( सभापती प.स.कंधार ) आनंदराव लाठकर ( म.गां. तंटामुक्त समिती अध्यक्ष उस्माननगर ) हे राहणार आहेत.तर पंचक्रोशीतील गरजू रुग्णांनी आरोग्य तपासणी शिबिराचा व किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य , व प्राध्यापकवृंद, कर्मचारी म. बसवेश्वर विद्यालय उस्माननगर यांनी केले आहे.

