नांदेड| लोटस एज्युकेशनल कॅम्पस व हॉस्पिटलच्या वतीने कॅन्सर डे चे निमित्ताने साधक कॅन्सर या आजारावर प्रकाश टाकणाऱ्या रॅलीचे आयोजन शनिवारी नांदेड शहरात लोटसचे प्रमुख डॉ संजय पडलवार यांच्या पुढाकाराने कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित नांदेड शहरात आयटीआय ते कलेक्टर ऑफिस अशी कँसर जनजागरण रॅली काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थी व कर्मचारी डॉक्टर यांच्या हातात कॅन्सर विषयी जनजागृती करणारे फलक होते.
जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्ताने नांदेड मध्ये लोटस एज्युकेशन संस्था व लोटस हॉस्पिटल यांच्या वतीने जागतिक कर्क रोग दिनाच्या निमित्ताने कॅन्सर या आजाराबद्दल प्रबोधन होण्यासाठी आयटीआय ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान जनजागृती रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये लोटस एज्युकेशनल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पथनाट्य व एकपात्री नाट्य प्रयोग सादर करत लोक समूहांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठीचा लोटसने या कार्यक्रमाचे आयोजन केले. लोटस हॉस्पिटलचे डॉक्टर संजय पडलवार, डॉ राहुल घंटे, डॉक्टर आनंद भगत ,डॉक्टर घाटे, डॉक्टर पाकुलवार, डॉ जितेंद्र नाथाणी, डॉ प्रीती कदम, डॉ पोकलवार तसेच लोटस एज्युकेशनल कॅम्पसचे प्रिन्सिपल श्रीकांत बारटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर डॉ आनंद भगत, डॉ संजय पडलवार, डॉ राहुल घंटे यांनी रॅलीला मार्गदर्शन केले विद्यार्थी व कर्मचारी यांच्या हातातजनजागृती फलक होते कर्क रोगाच्या प्रबोधन रॅलीने शहराचे लक्ष वेधून घेतले.