
लोहा| शिवछत्रपती विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा सवलती मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे मुख्याध्यापक दामोधर वडजे यांच्या पुढाकाराने पहिल्यांदाच लोह्यातील मुलींसाठी सायकल योजनेचा लाभ मिळाला. पालकांच्या उपस्थितीत या लाभार्थी मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या यावेळी मुलींना किमान बारावी पर्यंत शिकवा तसे शालेय स्तरावर विविध शैक्षणिक सुविधेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन मुख्याध्यापक श्री वडजे यांनी केले.

शिवछञपती माध्यमिक विद्यालय,लोहा येथे मानव विकास योजनेअंतर्गत इयत्ता 8 व्या वर्गात शिकतअसलेल्या कु.पुनम अंगद कापसे,मनिषा माधव जिल्लेवाड,गायञी वैजनाथ शेवडकर,दुर्गा राजकुमार घंटेवाड या विद्यार्थ्थींनींना सायकली वाटप करण्यात आल्या. तसेच प्रजासत्ताक दिना निमित्तानं घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दामोधर वडजे तर प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख एन.एस. कसबे, याकुबखान. उर्दू शाळेचे मुख्याध्यापक सुलतानखान प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक हणमंत पवार होते. तसेच पालक शाहीर कापसे मामा , माधव जिल्लेवाड,वैजनाथ शेवडकर,राजकुमार घंटेवाड याची उपस्थिती होती. यावेळी बी एन गवाले,कहाळेकर डी.एम.,पिठ्ठलवाड आर आर, गुध्दे व्हि.एस., हरिहर धुतमल, पारेकर आर.आर.,पवार एस.ई., श्रीमती आढाव, मीनाताई कळकेकर, हे शिक्षक तसेच राष्ट्रमाता अध्यापक महाविद्यालयाचे छाञाध्यापक हजर होते.

.मानव विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासुन वंचित राहु नये म्हणून शासनाकडुन मानव विकासची बस सेवा आहे.तसेच अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मुलींना बसची मोफत पास मिळते तर ज्या मुलींना या योजनेचा फायदा घेता येत नाही. त्यांच्यासाठी शाळेपासुन 5 किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर राहत असलेल्या मुलींची शिक्षणापासुन गळती रोखण्यासाठी इयत्ता 8 वी ते 12 पर्यंत शिकत असलेल्या मुलीसाठी मोफत सायकल योजना आहे. ग्रामीण भागातील सर्व मुलींनी किमान 12 पर्यंत शाळा सोडू नये हा उद्देश या योजनेचा आहे. या योजनेसाठी मुलींचे राष्ट्रीय बँकेत खाते असने गरजेचे आहे. अशी माहिती मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी दिली.

या वर्षी शाळेत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लोहा च्या वतीनेब शाळेत कैम्प लावुन 50 विद्यार्थ्यांचे खाते शाळेत काढले व कै. भाई केशवराव धोंडगे यांच्या जन्मशताब्धी निमित्तानं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मोफत नेञ तपासणी करुन 40 विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप मुख्याध्यापक दामोधर वडजे यांच्या प्रयत्नामुळे झाले. मुलींनी किमान १२ वी नियमित शिक्षण घ्यावे असे आवाहन मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन पिठ्ठलवाड आर.आर.यांनी केले तर आभार बालाजी गवाले यांनी मानले .

