
अर्धापूर, निळकंठ मदने| ग्रामपंचायत अंतर्गत येणारे घरकुल,रस्ते,नाली,पीण्याचे पाणी, आरोग्य सेवा यासह आदि जनतेते कामे पारदर्शकपणे करा असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी केले.

पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी मिना रावताळे, ग्रामविस्तार अधिकारी मुंडकर, ग्रामसेवक, ग्रामपंचायत आपले सेवा केंद्र चालक यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ग्रामसेवक संघटनेचे आंदोलन असल्यामुळे ग्रामसेवक बैठकीला बसले नाही ,त्यावेळी त्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर सर्व विषयाची माहिती निजी कक्षात मध्ये दिली. केंद्र चालक यांची आढावा बैठक घेण्यात आली. तसेच गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पं) यांनी सर्व विषयाची सविस्तर माहिती दिली.

जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकारी (पं)यांची दिनांक 06.01. 2023 रोजी घेतलेल्या आढावा बैठकीतील सूचनाप्रमाणे ग्रामपंचायत कर वसुली, थोडीशी मायबापासाठीपण, हर घर नर्सरी ,माझे गाव सुंदर गाव ,नऊ थीम्स वर या विषयी ग्रामस्तरावर याची अंमलबजावणी होते की नाही याची पाहणी करण्यासाठी ग्रामपंचायत पिंपळगाव महादेव येथे भेट देऊन प्रत्यक्ष ग्रामपंचायत कर वसुलीची आढावा घेतला.

ग्रामपंचायतने जानेवारी 2023 या महिन्यात पाच लक्ष रुपये कर वसुली केल्याचे ग्राम विकास अधिकारी कदम सरपंच उपसरपंच यांनी सांगितले.सविस्तर ग्रामपंचायतीचे सर्व रेकॉर्ड सिक्स बंडल सिस्टीम गावातील विकास कामाची माहिती दिली .प्रत्येक ग्रामपंचायतीने तालुक्यातील शंभर टक्के कर वसुली संदर्भात सर्व ग्रामसेवकांना सविस्तर सूचना केलेले आहेत. फेब्रुवारी महिन्यात अर्धापूर तालुक्यात मोहीम शोरूपात पॅटर्न राबुन100% कर वसुली करण्यात यावे असे सूचना केलेल्या आहेत.

