
नविन नांदेड। सिडको परिसरातील मुस्लिम कब्रस्तान येथे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बोअर व संभाजी चौक सिडको परिसरातील नुर मस्जिद भागात सिमेंट काक्रेट रस्ता तयार करून देण्याची मागणी परिसरातील मुस्लिम बांधवांनी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे प्रत्यक्ष भेट घेऊन निवदनाव्दारे मागणी केली असून मागणीची दखल घेत काम करून देण्याचे आश्वासन दिले.

सिडको येथील मुस्लिम समाजा तफेॅ आमदार मोहनराव हंबडेॅ याना नुर मस्जिद समोरील सिमेंट काक्रेट रस्ता करीता व सिडको परिसरातील कब्रस्तान येथे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निवेदन नांदेड जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष शे.लतीफ भाई,शेख अशफाक मोहीऊदीन,सईद चाचा,शेख सहाब.शमशोदीन भाई.फहीमोदीन भाई,सिराज खान,नईमभाई ,तोफीख भाई.शादुलभाई.सुलतान भाई,महेबूबभाई ,मुसा भाई,निहाल भाई. मुजीब भाई.शहेबाज खान व सामाजिक कार्यकर्ते डॉ.नरेश रायेवार यांच्या सह शिष्टमंडळाने केली आहे. या वेळी आ. हंबर्डे यांनी काम करुन व बोअर मारून पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

