नविन नांदेड। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाऊंच्या कृपा व श्री संत आनंदगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री महादेव मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा निमीत्त ज्ञानदान व अन्नदानाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.
११ फेब्रुवारी रोजी आनंद दत्त महापुजा व भजनाचा कार्यक्रम राहील, यावेळी असदवन, वाघाळा, बाभुळगाव, गुंडेगाव, ढाकणी, झरी, बहाद्दरपुरा येथील भजनी मंडळ सहभागी होणार असून सोमवार, दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी महादेवाचा अभिषेक व पुजा, सकाळी १०.०० ते १२.०० ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वसुरकर यांचे हरी कीर्तन व नंतर महाप्रसादाला सुरुवात होईल.
या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती द.भ.प.गुरु रुद्रगीरी गुरुदयाळगिरी महाराज, द.भ.प.समगिरी गुरु जय गिरी महाराज द.भ.प. दत्तगिरी गुरु आनंदगिरी महाराज ,द.भ.प. गुरु रावसाहेब महाराज धनेगाव ,संत श्री जगदिश महाराज गाडीपुरा गो पालन समिती यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्याला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी ऊपसिथीत राहण्याचे आवाहन लालाराव दत्तराम पा. घोगरे, आबाजी दत्तराम पा. घोगरे शिवाजी दत्तराम पा. घोगरे आनसाजी बाबाराव पा. घोगरे दिगांबर विठ्ठलराव पा. घोगरे सुरेश आबाजीराव पा. घोगरे मोहन लालाराव पा. घोगरे , विठ्ठल दतराम पाटील घोगरे, समस्त घोगरे पाटील परिवार व आयोजक : संजय शिवाजीराव पाटील घोगरे जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, नांदेड यांनी केले आहे. सदरील महाप्रसाद कार्यक्रम दुपारी १२ वाजता पासून स्थळ घोगरे पाटील यांचा मळा, दत्त मंदिराच्या पाठीमागे, एनडी – ३१, हडको, नांदेड येथे होणार आहे.