
उस्माननगर, माणिक भिसे। शिराढोण ता.कंधार येथील किड्स क्लब इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती ,हिंदी मराठी गितावरील कलाविष्कार सादरीकरणामुळे पालक मंत्रमुग्ध झाले.

किड्स क्लब इंग्लिश मिडीयम स्कूल शिराढोण ता.कंधार येथे संस्थेचे संचालक संतोष संगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सौ.स्वाती संगेवार व सहशिक्षिका,शिक्षक यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्कूल मध्ये लहान लहान मुलांना योग्य असे मार्गदर्शन करून तालीम मध्ये घडविले.चार फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कंधार तालुक्यांचे तहसीलदार मा. विपुलसिंह यादव , मा. प्रणिताताई देवरे – चिखलीकर ( मा. जि.प.सदस्या तथा भाजपा महीला प्रदेशाध्यक्ष ) ,सरपंच खुशालराव पांडागळे , अवधूत पाटील शिंदे ,( सरपंच दहीकळंबा ) यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीत उध्दघाटन करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात श्रीगणेशा या गितांनी बालकांनी सुंदर असे सादरीकरण केले .या गीतावर प्रेक्षक ,पालक आनंदीत होऊन टाळ्या वाजवून दाद दिली.त्यानंतर देशभक्ती ,हिंदी ,मराठी ,व लावणी गीतावर व सध्या गाजत असलेल्या वेलकम , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचा गाथा व वेड , पुष्पा ,सैराट या चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त सादरीकरणाने प्रेक्षक ,व पालक मंत्रमुग्ध झाली. या शाळेच्या चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहात आपल्या कलेच सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

किड्स क्लब इंग्लिश मिडीयम स्कूल ही संस्था परिसरातील लहान लहान मुलांना शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी संचालक संतोष संगेवार व सौ.स्वाती संगेवार हे मेहनत घेऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. सदर कार्यक्रमात चिमुकल्यांनी आपल्या अंगीकृत असलेले विविध कला गुणातून एकापेक्षा एक सरस व बहारदार नृत्याचे सादरीकरण करून प्रेक्षक नृत्य पाहून भारावून चिमुकल्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात कौतुक केले.उपस्थितत मान्यवरांनी चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलागुणांची प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या. सादरीकरणाने प्रेक्षक पालक आनंदीत झाले.

सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक संतोष संगेवार, यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सौ.स्वाती संगेवार , शिवानंद भुरे ,लक्ष्मण बोंदकुले , स्वाती देंवणे ,तारा कपाळे ,सुकेशनी पांडांगळे , कविता हलकोडे ,उमा महाजन , विजयमाला भुरे , कांचन मारवाडे , रूपाली पांडे पौर्णिमा इंगोले , सिध्देश्वर गजभारे यांनी परिश्रम घेतले.सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतील श्रोत्यांची व पालकांची मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

