नांदेड| पर्यावरणीय समस्यावर मार्ग करण्यासाठी शाश्वत पर्याय म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली प्लास्टिक बंदी ही प्रत्येक नागरिकांनी स्वतः जबाबदारी समजून प्लास्टिक मुक्त भारत स्वातंत्र्य चळवळ व्हावी आणि यात मुख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यकक्षा तथा जि.प.सदस्य सौ. प्रणिता देवरे-चिखलीकर यांनी केले.
त्या नांदेड प्लॉगजर्स या समूहाच्या प्लास्टिक मुक्त शहर चळवळीस एक वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्ताने आयोजित वर्कशॉप ते आयटीआय पर्यंत सामूहिक फेरीत सहभागी होऊन त्यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधताना आवाहन केले.
नांदेड शहर प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी नांदेड प्लॉगजर्स हा समूह गेल्या एक वर्षापासून प्रत्येक रविवारी प्लॅस्टिक मुक्त शहर चळवळीत सहभागी होणाऱ्या तरुण,विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या साह्याने ते नांदेड शहर स्वच्छ,प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सहभाग नोंदवतात. यावेळी सुयश ढगे, आकाश भोरे,ओंकार कुंटूरवार,विशाल परळीकर,करन इंगोले,श्रद्धा बालखंडे,वैष्णवी मातळकर यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.