
नवीन नांदेड। राजश्री पब्लिक स्कूल लातूर रोडनांदेड या शाळेच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा येथील ऐतिहासिक भवानी माता मंदिर व भव्यदिव्य महादेव मंदिर परिसरातील वन विभागाच्या उद्यानामध्ये करण्यात आले होते.

राजश्री पब्लिक स्कूल नेहमीच विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्नशील असते. संस्थेचे सचिव श्री.दिलीप पाटील , संचालिका डॉ. सौ. कल्पना पाटील , व्यवस्थापक श्री. सुशांत पाटील , यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक बी. के. फुले सर व महेंद्र कांबळे सर शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. याच अनुषंगाने विध्यार्थ्यांना आपल्या भौगोलिक परिसराची तसेच ऐतिहासिक वास्तूंची माहिती व्हावी याचबरोबर विद्यार्थ्यांचे मनोरंजन व्हावे व त्यांना मनसोक्त खेळता यावे याकरिता शाळेने हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले वारंगा फाटा येथील वन उद्यानाला भेट दिली.

वन विभागामार्फत या परिसरात विविध वन्य प्राणी-पक्षांच्या प्रतिकृती, चित्र व त्यांची माहिती दिली आहे तसेच प्रत्येकाला झाडांच्या विविध जाती माहिती व्हाव्या या उद्देशाने वेगवेगळ्या वन जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या संपूर्ण परिसराची सखोल अशी माहिती शाळेतील शिक्षक सुबोध पाटील व राजकुमार कोकाटे यांनी विध्यार्थ्यांना दिली. सर्व बालगोपाल विद्यार्थ्यांनी यावेळी वनभोजनाचा आस्वाद घेतला. यानंतर उद्यानात असलेल्या विविध खेळण्यांचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त खेळून आनंद घेतला. नंतर खाऊ देऊन शैक्षणिक सहलीचा समारोप करण्यात आला.

शैक्षणिक सहली मुळे सर्वच विद्यार्थी व पालक खुश झाले. सहलीच्या यशस्वीतेकरिता शाळेचे प्राचार्य महेंद्र कांबळे, सहशिक्षक राजकुमार कोकाटे, सुबोध पाटील, शुभांगी बल्लमखाने, उज्वला नादरे, सविता मोरे,अनुषा मराठा, सिंधू शिंदे, संध्या मुंडे, नीता चव्हाण, आम्रपाली खर्गखराटे, मोतीराम ढवळे, चांदु पावडे आदींनी परिश्रम घेतले.

