
हिमायतनगर,परमेश्वर काळे। मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांची निवड करण्यात आली आहे, त्यांच्या निवडीबद्दल हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने मादसवार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

काल दि 6 रोजी नांदेड येथील शासकीय विश्राम ग्रह सभागृहात नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची बैठक डिजिटल मीडिया परिषदेचे प्रमुख अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व मराठी पत्रकार संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बियाणी, जिल्हा सरचिटणीस राम टरटे, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे प्रमुख अनिल वाघमारे यांनी डिजिटल मीडिया परिषद जिल्हाध्यक्ष म्हणून दिलीप शिंदे, कार्याध्यक्ष म्हणून अनिल मादासवार, सरचिटणीस म्हणून संघरत्न पवार यांची निवड जाहीर करून निवडीचे पत्रक दिले.

डिजिटल मीडिया परिषदेच्या नांदेड जिल्हा कार्याध्यक्षपदी नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांची निवड झाल्यानंतर हिमायतनगर वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पहाराने त्याचा स्वागत सत्कार करण्यात आला तसेच पुढील कार्यासाठी शुभेच्छा ही देण्यात आल्या, यावेळी मंदिर कमिटीचे सेक्रेटरी अनंतराव देवकते, संचालक शांतीलाल श्रीश्रीमाळ, लताताई मुलंगे, मथुराबाई भोयर, संजय माने, विलासराव वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपिक बाबुराव भोयर, देवराव वाडेकर, अनिल सुर्यवंशी, मारोती मोरे, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

