
नांदेड। खरीप हंगाम 2022 सालचा चालु वर्षाचा प्रधानमंञी पिक विमा शेतकर्यांना नुकसान भरपाई मंजुर असतानाही विहीत मुदतीत विमा कंपनीने वितरीत केले नसल्याने शेतकरी पुञ संर्घष समितीने आक्रमक होत 20 तारखेपुर्वी शेतकर्यांच्या खात्यावर नैसर्गिक आप्पती, काढणी पश्चात,मिड अडवायझरीचे पैसै शेतकर्यांच्या खात्यावर टाकावे अन्यथा जिल्ह्याभरातील शेतकरी घेवुन 20 तारखेला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याच्या इशारा शेतकरी पुञ संर्घष समितीचे बालाजी पाटील ढोसणे, बालाजी पाटील सांगवीकर यांनी आज दिला.

नांदेड जिल्ह्याला खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.यामुळे प्रधानमंञी पिक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकर्यांनी आपल्या पिकांची नुकसानीची पुर्वसुचना विमा कंपनीकडे दाखल केलेत पंचनामे पण झाले व पंचनामे झाल्या एक महिन्यात विमा दावा देणे कंपनीला बंधनकारक असताना विमा कंपनी केंद्राकडे बोट दाखवत आहे.

यामध्ये शेतकरी भरडला जात असुन विमा नुकसान भरपाई म्हणुन नैसर्गिक आपत्तीचे 97 कोटी व काढणी पश्चातचे 3 कोटी असे एकुण 101 कोटी रुपये तर 25 टक्के आगाऊ रक्कमेचे जवळपास 57 कोटी रुपये युनायटेड इंडीया इन्सुरन्स कंपनी वाटप करीत नसुन ति रक्कम शेतकर्यांना 20 तारखेपुर्वी वाटप करा अन्यथा सर्व शेतकर्यांना घेवुन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी पुञ संर्घष समितीचे बालाजी पाटील ढोसणे,बालाजी पाटील सांगवीकर,सांगवीचे सरपंच योगेश गायकवाड यांनी नांदेड येथे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांची भेट घेवुन केली.

गेल्या वर्षीच्या प्रधानमंञी पिकविमा योजनेच्या 3000 अँप्लीकेशन धारक शेतकर्यांचे 94 लाख रुपये खाते नंबर चुकीचे,आयएफएसी कोड चुकीचे असल्याने इफको टोकीयो पिकविमा कंपनीकडे शिल्लक असुन त्या शेतकर्यांचे पण बँकाना कळवुन त्या शेतकर्यांना नुकसान भरपाई मंजुर असुनही बँकेच्या दुरुस्ती मुळे अडकुन पडलेल्या शेतकर्यांना लाभ मिळवुन देण्याची आग्रही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकरी पुञ संर्घष समितीने केली.यावर पंधरा दिवसात त्या शेतकर्यांच्या खात्यावर पैसे टाकण्याचे आश्वासन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी शेतकरी पुञ संर्घष समितीच्या पदाधीकार्यांना दिले.

