
हिमायतनगर। संत गजानन बाबा कलशारोहण सोहळा निमित्त मौजे विरसनी येथे भागवत कथाकार ह.भ.प. गजानन महाराज तामसेकर यांच्या मधुर वाणीतून भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून हा सप्ताह दि. 6 पासून ते 13 पर्यंत राहणार आहे; तरी या कथेचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान समस्त विरसनी येथील गावकरी मंडळींनी केले आहे.

या कलशारोहण सोहळा निमित्त दि.६ पासून दररोज किर्तनाचे आयोजन केले आहे. यामध्ये ह.भ.प.राधिका माऊली सहस्त्रकुंड तसेच वैशाली ताई महाराज कोसमेटकर, गणेश महाराज उमरीकर, पांडुरंग महाराज घेरडीकर, गजानन महाराज तामसेकर, विठ्ठल महाराज आळंदीकर, अमृत महाराज वडगावकर तर शेवटचे काल्याचे किर्तन मारुती महाराज दिग्रसकर यांचे होईल. यावेळी संत श्री देवगिरी गुरु आनंद गिरी महाराज दत्त संस्थान दिघी, ह. भ. प.शिवाजी महाराज वडगावकर, ह. भ .प.सागरबाई कुदळे पांगरीकर, ह. भ.प.कोंडबा ताडकुले वडगावकर यांची उपस्थिती राहणार आहे.

