
नवीन नांदेड। एन.सी.सी.52 महाराष्ट्र बटालियने पुनित सागर अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम शिवाजी विद्यालय सिडको,नांदेडच्या एकुण ४८ कॅडेट्स च्यावतीने आज दिनांक ०७ फेब्रुवारी २०२३ रोजी विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदीर प्रांगणात व गोदाकाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

केद्र शासनाच्या पुनित सागर अभियान अंतर्गत या स्वच्छता मोहीम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काळेश्वर देवस्थान चे विश्वस्त धारोजीराव हंबर्डे हे होते. यावेळी एन.सी.सी.52 महाराष्ट्र बटालियन शिवाजी विद्यालय सिडको, नांदेड येथील सहाय्यक एन.सी.सी. अधिकारी एस .आर.भोसीकर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

सदरील अभियान अंतर्गत परिसरातील मंदिर, व गोदकाठ सह अनेक भागात केरकचरा व साफसफाई करत ही स्वच्छता मोहीम घेऊन अभियान केले या मुळे परिसरात स्वच्छता दिसून आली.

