
भोकर। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय नामदार प्रा.डॉ. तानाजी सावंत साहेब आरोग्य मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्या बाबत सूचित केल्यानुसार दि. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर व भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अनंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजन केले आहे.

” रक्तदान आहे जीवनदान ते वाचवते दुसर्याचे प्राण ! “

रक्तदान करणाऱ्या ईच्छक रक्तदात्यांनी दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे रक्तदान करावे असे आवाहन ग्रामीण रुग्णालय भोकरचे रक्तपेढी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनोज पांचाळ, आरोग्य सहायक सत्यजीत टिप्रेसवार, आरोग्य कर्मचारी पांडुरंग तम्मलवाड, आरके एसके समुपदेशक सुरेश डुमलवाड यांनी केले आहे.

