हिमायतनगर। मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक भागात जाज्वल्य देवस्थान म्हणून श्री परमेश्वर मंदिर पुर्वी पासुन प्रसिद्ध आहे. देवस्थान कडुन विकासाची कामांना खरी सुरुवात परमेश्वर ट्रस्ट कमिटीच्या उपाध्यक्ष म्हणून महावीरचंद श्नीश्नीमाळ यांनी पदभार स्वीकारल्यापासून खरी सुरुवात झाली आहे. आगामी काळात होणाऱ्या महाशिवरात्र यात्रा महोत्सव सुरू होण्यापूर्वी मंदिरा सह परीसरात रंगरंगोटीचे कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचा कारभार धर्मदाय आयुक्तच्या मार्गदर्शनाखाली पदसिद्ध अध्यक्ष म्हणून तहसीलदार काम पाहत आहेत. ऊपाध्यक्ष महाविरचंद श्नीश्नीमाळ हे प्रसिद्ध व्यापारी असुन देवस्थानच्या कामासाठी निस्वार्थ भावनेने काम करत आहेत. सुदैवाने सर्वच ट्रस्टी त्यांच्या सर्वच कामांना निस्वार्थ भावनेने सहकार्य करीत आहेत. श्री परमेश्वर देवस्थान कमिटी कडुन १५८ व्यापारी गाळ्यांचे काम यापुर्वीच झाले आहे. ट्रस्टी मध्ये शांतीलाल श्नीश्नीमाळ यांच्यासह तिघाचा समावेश झाला होता. सचालक झाल्या पासुन शांतिलाल यांनीही भाऊ महावीरचंद श्नीश्नीमाळ यांच्या पावलांवर पाऊल ठेवून मंदिराच्या कामांसाठी स्वताला झोकून देत असल्याचे दिसून येत आहे. ऊपाध्यक्षासह सर्वच संचालकांच्या मदतीने परमेश्वर मंदिराच्या समोरील आवारात फरशी बसविण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारासह भोकर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील परमेश्वर मंदिराच्या कमानीवर परमेश्वर देवस्थानचे आकर्षित डिजिटल नाव जवळपास ७५ हजारांच बोर्डवर कोरले आहे.
मदिराच्या समोरच्या प्रवेश करताना उजव्या बाजूला सुंदर तेवढेच आकर्षक महा गणपती मंदिर उभारले आहे. विहिरीवर कारंजे बसविण्यात आले आहेत. दोन्ही बाजूला सुंदर अशी वृक्ष लावल्याने मंदिराच्या नैसर्गिक वातावरणात भर पडली आहे. शहरात प्रवेश केल्यावर मंदिराच्या समोरच्या व्यापारी गाळ्यांच्या पाठिमागे नव्याने १६ व्यापारी गाळ्यांचे काम चालू आहे. अध्यक्ष तथा तहसीलदार डी.एन. गायकवाड, उपाध्यक्ष महावीरचंद श्नीश्नीमाळ, सचीव अनंतराव देवकाते, जेष्ठ ट्रस्टी लक्ष्मणराव शक्करगे, दे.ल.मुधोळकर, प्रकाश कोमावार, शामभाऊ पवनेकर, माधवराव पाळजकर, प्रकाश शिंदे, राजाराम बलपेलवाड, विठ्ठलराव वानखेडे, लताताई पाध्ये, मथुराताई भोयर, लताताई मुलंगे, वामनराव बनसोडे, शांतिलाल श्नीश्नीमाळ, अँड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड , लिपिक बाबुराव भोयर गुरुजी ही टिम देवस्थानच्या विकास कामांसाठी आपला वेळ देत आहेत.
शांतिलाल श्नीश्नीमाळ यांच्या कामांचा गौरव….. उपाध्यक्ष महावीरचंद श्नीश्नीमाळ यांनी ज्या पद्धतीने देवस्थान च्या विकास कामांसाठी स्वताला झोकून दिले होते. त्याच गतीने संचालक शांतिलाल श्नीश्नीमाळ यांनी देखील भुमिका घेतली आहे.शहरासह परीसरात प्रसिद्ध व्यापारी म्हणून त्यांची गणना आहे.अशा अवस्थेत भावा बरोबर त्यांनी देखील देवस्थानची धुरा सांभाळली असून, भाविकांना मंदिरात प्रवेश केल्यावर समाधान वाटुन मन प्रसन्न होईल असे काम चालू असून, त्यांच्या देखरेखीखाली होत असलेल्या कामांचा गौरव भाविक भक्तांतून केला जात आहे. भविष्यात उपाध्यक्ष महावीरचंद श्नीश्नीमाळ यांचा वारसा त्यांच्या कडे आला तर आश्चर्य वाटायला नको अशीच त्यांची आगेकूच सुरू आहे.
देवस्थानचे सर्वच संचालकांसह भाविकांच्या सहकार्याने सामान्यांच्या हितासाठी दवाखाना सुरू करण्याची कल्पना… महावीरचंद श्नीश्नीमाळ…. शहरांसह तालुक्यातील सामान्य कुटुंबातील भाविकांच्या सोयीसाठी परमेश्वर देवस्थान कडून दवाखाना सुरू करण्याचे नियोजन असल्याचे उपाध्यक्ष महावीरचंद श्नीश्नीमाळ यांनी सांगितले. मदिराच्या विकासासाठी आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचेही सहकार्य मिळाले आहे. शहरासह देणगीदार भाविकांचे देखील मंदिर विकासासाठी सहकार्य असल्याचेही श्नीश्नीमाळ म्हणाले.