
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे दाबदरी – भोडणी तांडा येथे अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारु गावांतील कांही प्रस्तापित मंडळी ‘गाळप करुन, आजुबाजूच्या गावांतील लोकांना दारुच्या व्यसनात गुंतवित आहेत. तसेच दारु पिवुन गावांत भांडणतंटे वाढत असुन, आम्हा महिलांचे जगणे मुश्किल होत आहे, त्यासाठी तात्काळ कार्यवाही करून दारूमुक्त गाव करावं अशी मागणी महिलांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आम्ही आमच्या कुटूंब प्रमुखांना कंटाळुन सेवेत सदर अर्ज सादर करीत असल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. दारुच्या व्यसनातुन आमच्या गावांचा व आमच्या संसाराची राखरांगोळी होत आहे. आमचे गरीब माणस रात्रंदिवस दारुच्या आहारी जावुन कांही कामधंदा करीत नाही. वेळीअवेळी अल्पवयातच दारु पिण्यांमुळे अकाली मृत्यु पावत आहेत.

त्यामुळे पोलिसांनी सामाजीक बांधीलकीच्या नात्याने आपल्या अख्यात्यारीक हि बाब येत असल्याने, आपल्याकडुन कायद्याचे पालन झाल्यास आमच्या गावांतुन दारुचा नाश होणार आहे. म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी अवैद्यरित्या दारू विक्री करणाऱ्यावर कडक कार्यवाही करुन आमचा संसार वाचवावा अशी मागणी महिलांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

