
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। नायगांव शहरातील संत रोहिदास नगरमध्ये दिनांक 05/02/2023 रोजी संत शिरोमणी गुरू रविदास महाराज यांच्या 646 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमानिमित्त कामगार मेळव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नायगांव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ.मिनाताई सुरेश पाटील कल्याण तर या कार्यक्रमास सामाजिक कार्यक्रर्ते गजानन पाटील चव्हाण, महेश कदम, शिवाजी कांबळे,रोहिदास पाटील, नागेश हवेलीवर, भालके संदीप, राजू सोनटक्के, संतोष सूर्यवंशी, संतोष भालके,नागेश भालके,संजय सोनटक्के, सुनील हवेलीवर, अनिल हवेलीवर, माधव सोनटक्के, ज्ञानेश्वर सोनटक्के, गगासागर मोहन गंधारे,कुसुमताई कांबळे,अंजनताई कांबळे,शोभाताई कांबळे,जमनाबाई सोनटक्के विमलबाई सोनटक्के, आमिना शेख, ईत्यादीची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात संत गुरू शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर उपस्थित कामगांराना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला रोहिदास नगर परिसरातील व तालुक्यातील चर्मकार समाज बांधव व महिला भगिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

