
उस्माननगर। उस्माननगर बीट केंद्र अंतर्गत येणाऱ्या लाट खुर्द तालुका कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आठवी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.

यावेळी शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख जयवंतराव काळे हे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विद्या वांगे , विठ्ठल पाटील घोरबांड ( आध्यक्ष शा.व्य.समिती लाठ खु) चेअरमन दत्तात्र्य संभाजीराव घोरबांड , राहूल सोनसळे ( मुख्याध्यापक सम्राट अशोक प्राथमिक शाळा उस्माननगर) यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक दत्ता गाडेकर यांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.

यावेळी शाळेच्या सहशिक्षिका सौ.नभा विनायकराव कुलकर्णी यांनी स्वखर्चातून वर्ग पहिली मध्ये विविध शालेय जीवनात उपयोगी पडणाऱ्या साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाघाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. सौ.नभा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारे शैक्षणिक जीवनातील प्रदर्शन पाहून पाहुण्यांनी अभिनंदन केले.

त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी कु. पूर्वी इंगोले, कु. सह्याद्री घोरबांड ,कु. अंकीता बाबळे ,कु. श्रेया इंगोले ,कु.वैष्णवी घोरबांड ,कु. नंदिनी बाबळे , यांनी प्रमुख पाहुण्यांचे ” इतिहासाचे रंग रूप हे “सुंदर गीत गाऊन स्वागत केले. त्यानंतर शालेय उपक्रमाचे उद्घाघाटन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी थोर महापुरुषांच्या विचारावर समोयचीत भाषणे केली. याचबरोबर ” स्त्री शिक्षणाचे महत्त्व” या विषयावर नाटिकाचे सादरीकरण कु. प्रिती कोल्हे ,कु.पुजा गवारे ,पुजा इंगोले , यांनी केले तर अंकिता बाबळे हिने शेतकरी बाप , व पूजा गवारे, भाग्यश्री इंगोले, हिने ओल्ड सासू मॉर्डन सून हे गीत सादर करून टाळ्यांची दाद मिळाली .

दुसऱ्या सत्रात शिक्षण परिषदेमध्ये केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांनी शिक्षकांना अनमोल असे शिकवणे संदर्भात मार्गदर्शन केले तर बाजीराव पाटील व नितीन लाठकर यांनी सधन व्यक्ती म्हणून शिक्षणाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक दत्ता गादेकर ,सौ.नभा कुलकर्णी , प्रदीप धुळशेट्टे गावकऱ्यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश ताटे यांनी केले तर आभारप्रदर्शन उडबुके यांनी मानले. या शिक्षण परिषदेला केंद्रांतर्गत सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

