नांदेड| सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगातील कला सादर करण्याची संधी मिळते आणि आजची चिमुकली विद्यार्थी उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या अंगात विविध कलागुण असतात आणि त्यांना संधी मिळताच त्यांचा अभ्यासासह सांस्कृतिक कार्यक्रमातून सर्वांगीण विकास होतो अशी प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.प्रणिता देवरे-चिखलीकर यांनी केले.
धनगरवाडी ता.जि.नांदेड येथील साईबाबा संस्थान संचलित साईबाबा इंग्लिश स्कूल आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद् घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी जि.प.नांदेडच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ.रेखा काळम-कदम, नरंगले अकॅडमी चे संचालक नरंगले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी संवाद साधत मनोगत व्यक्त केली.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागतगीता द्वारे उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी आपल्यात असलेले कलागुण सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केले तसेच विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. यावेळी लोहा भाजपा तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील ढाकणीकर,नंदकिश्वर धावरी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर कदम,मस्के सर नारायण पा.कळकेकर,कैलास कदम, मुख्याध्यापिका मनीषा शिंदे व समस्त शिक्षक वृंद विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.