
नांदेड। दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीदिनी सीटू संलग्न वन कामगार कर्मचारी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली माहूर शहरामध्ये घेण्यात आली होती. वनमजुरांचे थकीत वेतन देण्यात यावे आणि युनियनच्या सर्व कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात घेण्यात यावे. या जीवन मरणाच्या प्रमुख दोनच मागण्या घेऊन सर्वांच्या स्वाक्षरीने उपवनसंरक्षक श्री केशव वाबळे आणि माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री रोहित जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या.

दिनांक 17 ते 19 ऑक्टोबर 2022 असे सतत तीन दिवस उपवनसंरक्षक कार्यालय चिखलवाडी कॉर्नर नांदेड येथे तिन दिवस उपोषण व धरणे आंदोलन केले आहे. तेव्हा उपवनसंरक्षक यांनी त्यांच्या कक्षामध्ये शिष्टमंडळांसोबत चर्चा करून मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिले आहे. तसे ऑक्टोबर महिन्यातील लेखी पत्र संघटने कडे प्राप्त आहे. परंतु सहा महिने उलटूनही कामगारांना अद्याप कामावर घेण्यात आले नाही किंवा त्यांचे वेतन देण्यात आले नाही.

ही बाब गंभीर असून केलेल्या कामाचा मोबदला महिन्याच्या दहा तारखेच्या आत देण्यात यावा असा कायदा आहे परंतु वन अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे वनमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकार मागेल त्याला काम देण्याच्या जाहिरातीवर करोड रुपये खर्च करीत असताना वन अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाच्या प्रतीक्षात असलेले वनमजूर कामावर रुजू होण्याचे आदेश द्यावेत म्हणून सामूहिक उपोषणास बसले आहेत.

नक्षलप्रवन,आदिवासी व डोंगराळ भाग म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या माहूर तालुक्यातील सर्वच्या सर्व शासकीय सहा रोपवाटिका बंद असल्यामुळे हिरवळीने लक्ष वेधून घेणारे स्थळ भकास व ओस पडली आहेत. अनेक रोपवाटिकेमध्ये अतिक्रमण व नासधुस नित्याचीच झाली असून वन कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे जंगलतोड व वनवा लागण्याच्या घटनांमध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील सहा महिन्यापूर्वी वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नसल्यामुळे दिनांक 8 फेब्रुवारी वेळ सकाळी 11 वाजता पासून सिटू च्या झेंड्याखाली वन मजुरांचे सामूहिक उपोषण वन विभागाच्या मुख्य कार्यालयासमोर सुरू आहे.

सहा महिन्यापूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता तात्काळ झाली नाही तर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या शेकडो महिला दिनांक 9 फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी डीएफओ कार्यालयास घेराव घालणार असल्याचे सीटूच्या राज्यसचिव कॉ.उज्वला पडेलवार व जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड यांनी उपोषणार्थींना भेटून समर्थन देताना स्पष्ट केले आहे.

सदरील आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड,माहूर स्थानिक कमिटीचे अध्यक्ष कॉ.निळकंठ (माऊली) जाधव, कोषाध्यक्ष कॉ.दिगंबर टेंबरे,भीमराव सीडाम, उत्तम साखरे, कॉ.शकुंतलाबाई कवठेकर, कॉ.सजूबाई राठोड, कॉ.साईनाथ टेंबरे, कॉ.कैलास कवठेकर असंघटित चे कार्याध्यक्ष कॉ.श्याम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.दिलीप पाईकराव आदीजन करीत आहेत.

