
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील सीमा भागातील प्रश्न समजून घेण्यासाठी देगलूर येथील उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात 15 फेब्रुवारी 2023 सकाळी 11 वाजता बैठक घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील सीमा भागातील प्रश्न समजून घेऊन ते तातडीने सोडवण्यासाठी याचबरोबर दीर्घ मुदतीचे विकास विषयक प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी महसूल विभागाच्या उपविभागीय कार्यालयात बैठक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमान अभिजीत राऊत यांनी दिले होते.

मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार देगलूर तालुक्यातील सीमावर्ती भागातील प्रश्न समजून घेऊन तातडीने सोडविण्यासाठी बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी अकरा वाजता बैठक घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रानी सांगितले. प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर, समन्वयक श्री नरसिंगराव देशमुख यासह विविध समन्वयक आणि सहभागीदार या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत मांडले जाणारे प्रश्न आणि प्रश्न सोडवण्याविषयी प्रशासनाची तत्परता याबाबीकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

