
हिमायतनगर/भोकर। आज दि.08-02-2023 रोजी परिचर्या प्रशिक्षण केंद्र नांदेड येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ यांची बैठक घेण्यात आली.

यामध्ये सर्वानुमते राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ शाखा नांदेडच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री कृष्णा पांडुरंग चौधरी यांची निवड करण्यात आली. या प्रंसगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मा .जुनैद सलीम, जिल्हा लेखा व्यवस्थापक बाळासाहेब चौधरी,

राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ राज्य सहसचिव तुळजाप्रसाद कुलकर्णी, अफरोज सौदागर, नंदिनी वडे, रेणुका शिरसाट, चैताली जाधव , गंगाधर कोंके, शंकर श्रृंगारे, बालजी अन्नदाते , माणिक गिर गावकर, सिध्दार्थ थोरात यांनी निवडी बदल सत्कार करण्यात आला. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत .

