
हदगाव, शे चांदपाशा| हदगाव शहरात उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात या कामावर कुणाचंही नियंत्रण दिसुन येत नाही. प्रथम सिमेंट नाली बाधाकाम करण्यात आल्याने येणा-या अतिदक्षता रुग्णाना फार ञास झाला. त्या सिमेट नाल्यावर क्युरींग करण्यात येत नसल्याने त्या सिमेंट नालीना तडे जाण्याची शक्यता आहे.

सदर काम फार कासवगतीने करण्यात आले. या मुळे येणाऱ्या जाणा-या ओपीडीच्या रुग्णांना फार ञास झाला. त्या नंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ‘पेव्हर ब्लाँक ‘ या रुग्णालयच्या रिकाम्या जागेत ठेवण्यात आले त्या नंतर नागरिकातुन ओरड झाल्याने ते काम कामाला सुरुवात झाली ते पण हे काम
फारच संथगतीने कञाटदाराच्या सोयीनुसार योग्य रितीने झालेले नाही. अनेक पेव्हर ब्लाँक मध्ये भेगा सोडल्याचे दिसुन येतात.

सदर काम योग्यरितीने झालेले दिसुन येत नाही हे काम फारच घाईघाईने व मणाला वाटेल तेव्हा करण्यात येत असल्याने यांचा ञास येणा-या रुग्णांना त्यांच्या वाहनांना होत आहे. इतकेच नव्हे तर वापरण्यात येणाऱ्या चुरीमुळे यात मातीचे प्रमाण जास्त असल्याने ती धुळ रुग्णालयमध्ये उपचार घेणा-या रुग्णाला याचा ञास होत असल्याचे अनेक रुग्णांनी सागितले.

या बाबतीत रुग्णालयच्या संबधित यांनी या बाबतीत कञाटदाराच्या संबधितला सुचना देवुन ही काहीच उपयोग झाला नसल्याचे रुग्णालयच्या सुञानी सागितले. या बाबतीत दि.६फेब्रु २०२३ सार्वजनिक बाधकाम उपविभागीय अधिका-यांना या कञाटदाराच्या कामाच्या दिरगाई बद्दल निवेदन देण्यात आले. परंतु नेहमी प्रमाणे या निवेदनावर काहीच कारवाई झाल्याचे दिसत नाही…

कञाटदाराला सुचना दिल्या /कनिष्ठ अभियंता…
उपजिल्हा रुग्णालयाच्या परासरातील पेव्हर ब्लाँक व सिमेट नाली कामाच्या बाबतीत त्वरीत काम करावे या बाबतीत संबंधित कञाटदाराला सुचना दिल्या. या कामावर देखरेख करणारे सा.बा. विभागाचे कनिष्ठ आभियंता यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला माहीती दिली.
