
नविन नांदेड। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नवीन नांदेड मराठी पत्रकार संघ सिडको, नांदेडच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सिडको-हडको परिसरातील प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांसाठी प्रभातफेरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षिस वितरण दि. ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता गुरूकृपा मंगल हडको येथे बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजीत राऊत (भा.प्र.से.)जिल्हाधिकारी, नांदेड तर उद्घाटक म्हणून सौ. वर्षा घुगे – ठाकूर (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.नांदेड ,व प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण कोकाटे (भा.पो.से.) जिल्हा पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने,गोवर्धन बियाणी जिल्हाध्यक्ष, मराठी पत्रकार संघ, किरण अंबेकर तहसीलदार नांदेड, डॉ. शेख रईसोद्दीन सहाय्यक आयुक्त सिडको क्षेत्रीय कार्यालय, शिवराज बिच्चेवार महानगराध्यक्ष, मराठी पत्रकार संघ, नांदेड,अशोक घोरबांड पोलीस निरीक्षक, नांदेड (ग्रामीण) पोलीस स्टेशन यांच्या सह मान्यवरांच्यी ऊपसिथी राहणार असून या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन किरण देशमुख अध्यक्ष नविन नांदेड मराठी पत्रकार संघ,श्याम जाधव, उपाध्यक्ष,रमेश ठाकूर सचिव ,निळकंठ वरळे,कोषाध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे कार्याघ्यक्ष, तुकाराम सावंत, विशेष सल्लागार अनिल धमणे विशेष सल्लागार यांनी केले आहे. याच सोहळ्यात परिसरातील प्राथमिक व माध्यमिक शाळेना ऊपसिथीत मान्यवरांच्या हस्ते भिंतीवरील घड्याळाच्ये वाटप करण्यात येणार आहे.

