
नांदेड| डॉ.बाबासाहेबांच्या संघर्षाची मशाल रमाई… जिच्यामुळे बाबासाहेबांचं वर्तुळ पूर्ण झालं ती रमाई… प्रेम, करुणा, माया, वात्सल्य, त्याग, समर्पण, भावना या शब्दांना आकार देणारी एकमेव स्वाभिमानी माऊली आमची रमाआई यांच्या 125 व्या जयंती श्री गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात साजरी करण्यात आली.

यावेळी कॉलेजच्या प्रा. शारदा कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रा. विपिन कदम सर यांनी माता रमाईच्या जीवन चरित्रावर थोडक्यात माहिती दिली.प्रा संजय नरवाडे सर यांनी माता रमाईच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आणि सुरेख असे सूत्रसंचालन केले. यावेळी उपस्थित रोहित माळी, आदित्य कुंटे, श्वेता पाटील, पद्मा कांबळे यांनी पुष्प अर्पण केले. बालाजी कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

