नांदेड| स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनीभारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अभूतपूर्व योगदान दिले त्यांचे विचार तर्कशुद्ध व आधुनिक होते स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपले आयुष्य खर्ची घातले अशा स्वातंत्र्यवीराचे विचार सदैव प्रेरणादायी ठरतात असे प्रतिपादन सावरकर विचार मंचाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान खासदार चिखलीकर यांनी दिल्ली येथे केले.
वीर सावरकर विचार मंच दिल्ली याचे संस्थापक श्रीनिवास शर्मा शास्त्री व त्यांच्या सर्व सदस्यांनी दि ५ फेब्रुवारी रोजी खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली यावेळी या विचार मंचाच्या सदस्यांसोबत बोलताना खासदार चिखलीकर म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे आधुनिक विचार होते स्वातंत्र्य लढ्यातील काळ्यापाण्याची शिक्षा भोगताना त्यांचे जे हाल झाले आणि त्यातून प्रखर राष्ट्रभक्ती व नवी चेतना देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील तरुणांसमोर प्रेरणादायी ठरली हेच विचार आजच्याही काळामध्ये प्रेरणादायी आहेत. सावरकरांच्या विचाराने व सानिध्यात अंदमान ची भूमी जशी पवित्र झाली.
तशीच महाराष्ट्राची ही भूमी पवित्र झाली आहे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी सावरकर विचार मंचाचे संस्थापक श्रीनिवास शर्मा शास्त्री ,अड मोहन शर्मा शास्त्री ,उद्योजक गणेश शुक्ला ,भारतीय जनता पार्टी दिल्ली प्रदेश प्रवक्ता शक्ती कुमार बक्षी माजी नगरसेवक व रेल्वे बोर्डाचे सदस्य कृष्णा पापीनवार यांची उपस्थिती होती यावेळी सावरकर विचार मंचाच्या वतीने खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना सावरकरांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला.