
अर्धापूर| शिक्षण क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरू असून स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून परिक्षेत जास्तीत जास्त गुण कसे घेता येतील यासाठी रात्रंदिवस एक करावा असे आवाहन प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नगरपंचायतचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले आहे.

ज्ञानसाधना सायन्स व कॉमर्स अकॅडमीच्या वतीने च दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,प्रमुख मार्गदर्शन म्हणून पोली निरीक्षक अशोक जाधव,नगरपंचायत मुख्याधिकारी शैलेश फडसे,साहित्यिक,लेखक शिलवंत वाढवे,पत्रकार सखाराम क्षीरसागर,मृत्युंजय दूत गोविंद टेकाळे,सचिव गुणवंत विरकर,व्यंकटी राऊत,क-हाळे,गजानन गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते.आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून हार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतांना पोनि.अशोक जाधव म्हणाले की विद्यार्थ्यांनी ध्येय गाठण्यासाठी रात्रंदिवस एक करून परिक्षेत १००% गुण मिळवून यशाचे शिखर गाठावे तसेच त्यो विद्यार्थी हे करतो म्हणून तुम्ही तेच न करता ज्या क्षेत्रात तुम्हाला कॅरियर घडवायचे आहे.जिद्दीने पुर्ण करून नावलौकिकता प्राप्त करावी असे आवाहन जाधव यांनी उपस्थितीत विद्यार्थ्यांना केले आहे.या वेळी अध्यक्षीय भाषण छत्रपती कानोडे,कवी शिलवंत वाढवे आदींची भाषणे झाली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक प्रा.नंदकिशोर कल्याणकर,सुत्रसंचलन प्रा.तानाजी मेटकर यांनी केले. तर यावेळी संचालक मारुती बारसे, प्रा.दिपक राठोड,अँड.देलमड,प्रा.सदर्शन नांदेडकर ,प्रा. म्हेत्रे,प्रा. खुळे, प्रा. कदम,प्रा. स्वाती कल्याणकर, आरती मॅडम, बारसे मॅडम आदींनी कार्यक्रम यशस्वी केला आहे.

