
हिमायतनगर। येथे भव्य, दिव्य स्वरुपात साजरी होणाऱ्या क्रांतिकारी जगदगरु सेवालाल महाराज जयंती सोहळ्यास हजारोच्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन नितीन राठोड कांडलीकर यांनी केले.

दि. १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बंजारा समाजाचे अराध्य दैवत क्रांतिकारी जगदगरु सेवालाल महाराज यांची २८४ वी जयंती हिमायतनगर येथील रेल्वे स्टेशन येथे बंजारा कॉलनी यथे सेवा ध्वज येथून व गुरुकुल इंग्लिश स्कूल च्या मैदाना पर्यंत भव्य शोभायात्रा निघणार दि. १५ फेब्रुवारी २०२३ बुधवार रोजी भव्य, दिव्य स्वरुपात गोरबंजारा वेशभुषेत साजरी होणार व बैल गाडी वर प्रतिमेचे शोभायात्रा निघणार या जयंती सोहळयास तालुक्यातील वाडी, तांडयातील सर्व समाज बांधवानी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे नितीन राठोड कांडलीकर यांनी सांगितले.

