हदगाव/तामसा, गजानन जिदेवार। हदगाव शहरात मागील बर्याच दिवसा पासुन सुजान नागरिकांना गुंड प्रवृत्तीच्या मानसापासुन भिती निर्माण झाल्याने हदगाव शहरात भितीचे वातावरन झाले आसुन, असाच प्रकार सुनील पि.प्रल्हाद ढेपे वय ३९ वर्ष व्यवसाय हॉटेल चालक रा.बौद्ध भुमी हदगाव येथील असून त्यांच्यावर आन्याय झाल्याने त्यांनी सबंधित हदगाव पोलीस ठाण्यात स्वतः जाऊन तक्रार दिनांक ०५/०२/२०२३ रोजी दाखल केली.
दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, उमरखेड टी पॉईट पार्टनर येथे बालाजी दत्तराव ढोरे या दोघामध्ये माऊली फॅमीली लंच होम सुरु केले. दिनांक ०६/०२/२०२३ रोजी सायंकाळी सात वाजण्याचे सुमारास माऊली फॅमीली लंच होमवर सुनील प्रल्हाद ढेपे सोबत माझे पार्टनर बालाजी दत्तराव ढोरे तसेच हॉटेल वरील कामगार नामे रामेश्वर भोरकडे,आकाश गंगाराम लकडे,शोभाबाई दत्तराव ढोरे हे असतांना हदगाव येथील नामे शेख अजीम शेख,पाशा उर्फ इचोडा,शेख इमरान शेख बासद उर्फ गांधी,अलीम बागवान,अतीक नरसा पटेल सर्व रा. रजा नगर हदगाव येथील असून सुरवातीला माझे हॉटेल समोरील असलेल्या आकाश गंगाराम लकडे यांची मल्हार पानपट्टीवर व गजानन दत्तराव ढोरे यांची जय मल्हार पानपट्टीवर गोंदळ घातला.
राम भाऊराव ढोरे यांच्या रसवंती गृह येथे सुध्दा गोंधळ घालून त्यांनाही मारहान केल्या त्यानंतर माऊली लंच होम हॉटेल मध्ये आले. माझी हदगाव येथे इचोड़ा नावाची गँग आसल्याचे सांगितले. तुला माहीती नाही का असे म्हणुन माझ्या हॉटेल मधील प्लॅस्टीकच्या ५ खुर्च्या व दोन टेबल तोडले व हॉटेल मधील प्लेट किराणा सामान फेंकून अंदाजे १५०००/- रुपयेचे नुकसान केल्याचे ही सुनिल ढेपे यांनी पोलीसात सांगितले तसेच मी बोध्द समाजाचा आहे हे माहीत असुन सुध्दा हे महार के धेडे साले हमारा हप्ता शुरू कर असे म्हणाले.
यावेळी मी कशाचा हप्ता असे विचारले केली असता शेख अजीम शेख पाशा उर्फ इचोड़ा याने माझ्या काउंटरच्या गल्यामध्ये हात घातला. व गल्यातील जबरदस्ती १६०००/- रुपये नगदी काढून घेतले. त्यावेळी मी त्याला विरोध केला असता मला त्यांने स्टिलच्या रॉडने पायावर व हातावर मारहान करून पसार झाले.त्यांच्या विरुद्ध हदगाव पोलीस ठाण्यात गुरंन. २७/२०२३ कलम ३९४,३८४,३२३,४२७,२९४,५०६,व भादवी व सह कलम ३. १. (आर) (एस)गुन्हा दाखल करण्यात आला.
त्या दिवशी दुपारी चार वाजताच्या अंदाज वेळ असेल त्यावेळी पवार फोटोग्राफी राठीं चौक हदगाव येथून त्यांची आई गावाकडे जात असताना त्यांचा आईचा पाठलाग करत आनुओळखी वैक्ती पवार यांच्या आई सोबत गेले व जबरदसतीने वस्तीच्या बाजूला नेऊन सर्व दागिने काढून घेत काही जवळ आसलेले पैसे ही घेऊन चोरांनी घेऊन पळ काढला आईने आरडा-ओरड केला पण त्या विषायावर पोलीसांनि आद्याप ही लक्ष घातले नाही.
ही घटना ही त्याच दिवशी घडली आहे.हदगाव तालुक्यात दिवसा ढवळ्या दिवसा घटना घडत असतील तर महिला दागिने घालून रस्त्याने जाणे अवघड झाले आहे.पोलीस अधिकाऱ्यांची शहरात वचक राहिलेली दिसून येते नाही.पोलीस स्टेशनला प्रभारी पोलीस निरीक्षक असल्याने यांनी कृर्तव्यात कुठे तरी कमी पडत असल्याने शहरात पोलीस प्रशासनाची वचक राहिलेली दिसुन येथ नाही.अशी चर्चा ही जनतेतून होत आहे.