नांदेड| महाराष्ट्र राज्य सरकारने लोककलावंतांना विविध योजनेच्या माध्यमातून मदत करुन देण्यासाठी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या नावाने कलावंत आर्थिक विकास स्थापन करून कलावंतांचे जीवनमान उंचावणे, कोविड काळात जाहीर करण्यात आलेले पाच हजार आनुदानात वाढ करून २५ हजार रूपये करणे व कलावंतांच्या हिताच्या योजना सुरू करून कलावंतांना तात्काळ लाभ मिळवून देण्यात यावा. अशी मागणी मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटनेचे महासचिव डॉ उत्तमराव सोनकांबळे, प्रमोद गजभारे, सुभाष लोणे व शिष्टमंडळाने गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले निवेदन मुख्यमंत्री कक्षाच्या प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात कलावंतांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली असून निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शहरी व ग्रामीण कलावंत हा अतिशय सामान्य कुटुंबातील असून कलावंतांनी आपल्या राज्याचा सांस्कृतिक ठेवा जतन करून वाढविण्याचे काम करीत आलेला आहे. परंपरागत सांस्कृतिक ठेवा जतन करणाऱ्या ग्रामीण कलावंत हा कायम दुर्लक्षित राहिलेला आहे. कोविडच्या कार्यकाळात कलावंताची दयनीय अवस्था झाली कलावंतांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले.अक्षरश: उपासमार झाली आहे.
ती परीस्थीती आजतागयत असल्याचे पाहवास मिळत आहे. संपुर्ण महाराष्ट्रातील कलावंताने आनुदानाची वारंवार मागणी करून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कलावंतांना फक्त पाच हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली पण हे पुरेसे नसणारे अनुदान आहे. तरी पण घोषणा करुन प्रत्यक्षात अमलातच आलेली नाही. कांहीं कलावंतांना अल्प प्रमाणात लाभ मिळाला असला तरी बहुतांशी कलावंत वंचित आहेत. त्यामुळे ही योजना कलावंतापर्यंत पोहोचलीच नाही. तेव्हा आपण स्वतः लक्ष घालून कलावंतांना आर्थिक सहाय्य करून मदत करावी अनुदान वाढवून २५ हजार करून तात्काळ अंमलबजावणी करावी.
कलावंतांच्या विकासासाठी महाकवी वामनदादा कर्डक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, ६० वर्ष आसलेल्या कलावंतांसाठी देण्यात येणाऱ्या मासीक मानधनात वयाची अट न ठेवता कलावंतांना सरसकट ३ हजार रु. मासीक मानधन देण्यात यावे,प्रत्येक शहरात कलावंता साठी कॉलनी करून कलावंतांना मोफत घरकुल योजना राबवुन पक्के घर द्यावीत, कलावंतासाठी विषेश मोफत आरोग्य सेवा उपलध करुन द्दावी तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद गजभारे यांनी मागणी केली आहे.
यावेळी डाॅ.उत्तमराव सोनकांबळे ,ज्येष्ठ पत्रकार सुभाषराव लोणे ,नांमदेव इंगळे, संजय भगत , गजानन कानडे अदीची उपस्थीती होती व या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुंगटीवार, मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, महासचिव डाॅ.उत्तमराव सोनकांबळे यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.